Chikhali : चिखली रोड येथील गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – सेक्टर 18 ,महात्मा फुलेनगर, चिखली रोड (Chikhali) येथील गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. अभिषेक, गणेश याग, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला.

समाजात सामाजिक सलोखा वाढवा, लोकप्रबोधन व्हावे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच महाराष्ट्रातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला चालना मिळावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुलेनगर येथे वर्षभर विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतात.

Pune Railway : चेन्नई एक्सप्रेसमध्ये आठ लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या गणेश मंदिरात सकाळी श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगण्याचे सांगतात झाले. अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या माध्यमातून गायत्री गणेशयाग तर दुपारी बाराला जन्मसोहळा आणि महाप्रसाद झाला.’

जयंती निमित्त सकाळपासूनच भाविकानी मंदिरात गर्दी केली होती. प्रतिष्ठानच्या वतीने प्रवचन, भजन, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. शेकडो भाविकानी याचा लाभ घेतला. गणेश जयंती निमित्त सलग 19 व्या वर्षी “अखंड हरिनाम सप्ताहाचे”आयोजित केले आहे.जयंतीच्या दिवशी ग्रंथ दिंडीची परिसरातून पालखीतून शेकडो भाविकानी भव्य शोभायात्रा काढली.

गणेश जयंती सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाली असून विविध सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांना अनेक फायदे होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.