Pune Railway : चेन्नई एक्सप्रेसमध्ये आठ लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज – चेन्नई एक्सप्रेस मध्ये प्रवासी महिलेची पर्स (Pune Railway) चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला पुणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. चोरीला गेलेला आठ लाख 77 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवला.

विशाल विठ्ठल नागटिळक देशमुख (वय 30, रा. मुंडवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune : जागतिक शिक्षणासोबत संस्कृतीही जपा – अंकुश चौधरी

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई एक्सप्रेस मधून प्रवास करत असलेल्या एका महिलेची पर्स लोणावळा ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यान चोरीला गेली. ही घटना दोन फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. याबाबत महिलेचे पती बलविंदर सिंह मरवा (वय 44, रा. गुजरात) यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पुणे रेल्वे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील 52 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये दोन जण संशयीत आढळले. त्यांची ओळख पटवून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा लावला. मैसूर अजमेर एक्सप्रेस गाडीच्या जनरल डब्यामध्ये (Pune Railway) गर्दीत बसलेल्या विशाल देशमुख याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तो चोरलेले दागिने विकण्यासाठी मुंबईला जात होता. त्याच्याकडून आठ लाख 77 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.