PCMC : प्रामाणिकपणे शास्तीकर भरणा-या ‘या’ मालमत्ताधारकांना आता मालमत्ता कर भरावा लागणार नाही

एमपीसी न्यूज – अवैध बांधकामांवरील ( PCMC )शास्तीकराचा प्रामाणिकपणे भरणा करणा-या  पिंपरी-चिंचवड शहरातील 14 हजार 254  मालमत्ताधारकांची 205 कोटी 34 लाखांची रक्कम त्यांच्या मालमत्ताकराच्या बिलात समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे या मालमत्ताधारकांना मूळ कराचा भरणा करावा लागणार नाही.

शहरात 5 लाख 91 हजार 150 मालमत्ता आहेत. त्यापैकी 97 हजार 699 अवैध मालमत्तांना ( PCMC ) शास्तीकर लागू झाला होता. त्यातील एक हजार चौरस फुटापर्यंतच्या 60 हजार 83 अवैध मालमत्तांचा शास्तीकर यापूर्वीच माफ करण्यात आला होता. त्यापुढील मालमत्ताधारकांचा शास्तीकर माफ झाला नव्हता.

Baramati : विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू; महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खांबावर चढायला लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

शासनाने 3 मार्च 2023 पर्यंतच्या अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ केला.  या निर्णयाचा 31 हजार 616 मालमत्तांना लाभ मिळाला. यापैकी 14 हजार 254 मालमत्ताधारकांनी मूळ करासह 205 कोटी 34 लाख रुपयांच्या शास्ती कराची रक्कम भरली होती.

शास्ती माफीचा निर्णय झाल्यामुळे त्यांची भरलेली शास्तीची रक्कम आर्थिक वर्ष 2023-24 च्या मालमत्ताकराच्या बिलात समायोजित केली जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शास्तीची रक्कम भरलेल्या मालत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यातील काही मालमत्ताधारकांना तर पुढील सात ते आठ वर्ष मूळ कराचा भरणा करावा लागणार ( PCMC ) नाही. शास्तीच्या रकमेतून त्यांच्या कराचा भरणा पूर्ण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.