PCMC : टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्मित करून उद्यान विकसित करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील विविध ठिकाणी वेस्ट टू वंडर  टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ (PCMC ) कलाकृती निर्मित करून उद्यान विकसित करणार आहे.  चिखली सेक्टर क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इडब्ल्यूएस गृहप्रकल्पांमध्ये बहुउद्देशीय इमारतीकरीता उर्वरित व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

प्रभाग क्र.28 पिंपळे सौदागर परिसरातील गारमाळा कॉलनी येथील रस्त्यांचे  काँक्रिटीकरण करणे, परघळे कॉर्नर ते स्वराज्य गार्डन पर्यंतचा 12.00 मी रुंदीचा डी.पी रस्ता (स्मशानभूमी रोड ), नॅचरल आइस्क्रीम स्टोअर ते ट्राॅईज सोसायटी पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यास सल्लागार नियुक्ती, प्रभाग क्र.19 मधील नाल्यांची सुधारणा, प्रभाग  क्र. 11 मधील स्वामी समर्थ कॉलनी क्र.1 व 2 मधील रस्त्यांचे, त्रिवेणीनगर चौक ते कुदळवाडी चौकापर्यंत स्पाईन रस्त्यांचे, तुळजाईवस्ती परिसरातील तसेच  प्रभाग क्र.3  मोशी डूडुळगाव येथील विविध विभागांनामार्फत खोदण्यात आलेल्या ट्रेंचेसचे डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.

Mahavitran : पश्चिम महाराष्ट्रात वीज ग्राहकांकडे सुरक्षा ठेवीची थकबाकी 2 हजार 352  कोटींवर, वीजपुरवठा खंडित

प्रभाग क्र.15 मधील बसवेश्वर महाराज उद्यान मोकळ्या जागेवर नव्याने विकसित केलेल्या उद्यानाचे देखभाल काम करणे कामी,  दिव्यांग भवनामध्ये मेस्को मार्फत सुरक्षा व्यवस्था करणेकामी,  समाज विकास विभगाकरीता दिव्यांग भवनासाठी आवश्यक असलेली साधने खरेदी करणेकामी, मनपाच्या विविध विभागाकरीता टोनर खरेदी करणेबाबत,  महापालिकेच्या (PCMC ) अजिंक्यतारा सोसायटी, ताम्हणे वस्ती, तळवडे येथे स्ट्रीटलाईट वीजमीटर घेणे कामी महाराष्ट्र विद्युत मंडळास अनामत रक्कम तसेच जोडणी शुल्क अदा करणेबाबत मान्यता देण्यात आली.मनपाचे से. नं. 27 नर्सरीसाठी माळी व मजूर कर्मचारी पुरविणे बाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे वैद्यकीय विभागाच्या सर्व रुग्णालयांकरिता उपकरणे खरेदी करणेकामी, नवीन थेरगाव व भोसरी रुग्णालय येथे नेत्र (PCMC ) विभागाकरिता उपकरणे करणे खरेदी करणेबाबत मान्यता देण्यात आली.  यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागाकरिता आवश्यक सर्फेस कोटींग  करणेकामी, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमधील ग्रंथालयांकरीता आवश्यक पुस्तक खरेदी करकरणे  मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या करसंकलन विभागाकडील मिळकतकर संगणक प्रणालीची दुरुस्ती व देखभाल करणेबाबत, प्रभाग क्रमांक 12 मधील कॅनबे चौक ते स्पाईन रस्त्याला जोडणारा 18 मीटर रुंद डी.पी रस्ता विकसित करणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करणेबाबत  मान्यता देण्यात आली.
अ प्रभाग कार्यक्षेत्रातील जुन्या मनपा आरसीसी इमारतींचे संरक्षणात्मक परीक्षण करणे कामी डिझायनरची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.  मनपाचे ह क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औष्णिक धुरीकरणासाठी तीन चाकी, चार रिक्षा टेम्पो वाहन इंधन  व वाहनचालका सहित भाड्याने घेणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात (PCMC )आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.