Tree plantation:  दुर्गादेवी टेकडीवर 75 वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झाडांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी तसेच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे.(Tree plantation) यानिमित्त दुर्गादेवी उद्यानाच्या टेकडीवर उद्यान विभागामार्फत विविध प्रकारची 75 देशी झाडे लावण्यात आली आहेत.  

महापालिकेच्या वतीने  15 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त झालेल्या वृक्षारोपणा प्रसंगी शहर अभियंता मकरंद निकम, उद्यान विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष सूर्यकांत मुथियान, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, माजी सह शहर अभियंता प्रविण लडकत, माजी नगरसदस्या शर्मिला बाबर, माजी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य गोविंद पानसरे, जगन्नाथ वैद्य, डॉ. आशा राव, राजीव भावसार, लायन्स क्लब पुणे आकुर्डी अध्यक्ष अनिल भांगडीया, ओमप्रकाश पेठे, सुप्रभात ग्रुपचे प्रतिनिधी, सूर्यनमस्कार ग्रुप चे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Nishan Short film : दारिद्र्याच्या छायेखाली राहणाऱ्या चिमुकल्यांचे देशप्रेम दर्शविणारा “निशान” लघुपट प्रदर्शित!

यावेळी उपस्थित सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्याद्वारे  लावलेली झाडे जगवण्याची व वृक्ष मित्रांनी एकमेकांना सहयोग करण्याबाबतची प्रतिज्ञा केली.(Tree Plantation) तसेच उद्यानात प्लास्टिक वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सप्ताह मध्ये शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्था, बचत गट, वृक्षप्रेमी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.