PCMC : गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा – समीर जावळकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या (PCMC) वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून दिलेल्या जाणा-या प्रोत्साहनपर बक्षीस रकमेतील तफावत पूर्ववत करण्याची मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी केली आहे.

Pune : विविध संस्थांच्यावतीने जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात जावळकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरुपात शिष्यवृत्तीची रक्कम प्रोत्साहनपर बक्षीस स्वरुपात प्रदान करण्यात येते.

दहावीतील एसएससी बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्याला दहा हजार रुपये, 15 हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. तेवढेच गुण प्राप्त केलेल्या सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्याला ५ हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.

त्याचप्रमाणे बारावीच्या एसएससी बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही 10 हजार आणि 15 हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.

सर्वांना समान न्याय देण्याच्या तत्त्वास अनुसरून एसएसी बोर्ड, सीबीएससी बोर्ड आणि आयसीएससी बोर्ड असा भेदभाव न करता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची समान रक्कम अदा करावी. त्यासाठी शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करावी, अशी मागणी जावळकर यांनी (PCMC) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.