PCMC : “यूपीएससी” उमेदवारांना परीक्षेसाठी मिळणार वेळ

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध (PCMC) उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 387 जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या जागांसाठी 26, 27 व 28 मे ला राज्यातील विविध परिक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. मात्र, यूपीएससीच्या परीक्षा याच काळात होत असल्याने दोन्ही परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली. पालिकेच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले.

त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा 131 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विभागांतील 387 रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविली आहे. यासाठी सुमारे 85 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Hadapsar : कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न,पतीचा मृत्यू

केंद्रीय लोकसेवा आयोगाची आणि महापालिका भरतीची तारीख एकच आली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. 350 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याने महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला (PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.