Ravet News : पाणी पुरवठा विभागाने केलेल्या खोदकामाचा वाहनचालकांना नाहक त्रास

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्य रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना आज दिवसभर त्रास सहन करावा लागला. (Ravet News) ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत नाहक त्रास सहन करावा लागला.

याबाबत माहिती देताना, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले की, आज सकाळी रावेत मधील नॅनो होम्स जवळील चौकात मुख्य रस्त्यावर मधोमध रस्ता खोदून ठेवला होता. या चौकात सांगवी – किवळे बीआरटी रोड संत तुकाराम पुल (हँगिंग ब्रिज) वरून येतो व पुढे किवळे येथील मुकाई चौकाकडे व एक्सप्रेस वे ला जातो. या चौकात आकुर्डी रेल्वे स्टेशन व वाल्हेकरवाडी येथून येणारे रस्ते मिळतात. त्यामुळे हा खूप महत्वाचा व गर्दीचा चौक आहे. त्यामुळे येथून ये-जा करत असलेल्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच परिसरात वाहतूक कोंडीही होत आहे.

Swargate News: अग्निशमन विभागाकडून पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपो येथे आग प्रतिबंधक उपायांचे प्रशिक्षण

ते पुढे म्हणाले की रस्ता मधोमध खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. हा खड्डा 7 ते 8 फुट खोल असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशात मनपा ने तेथे अपघात होऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावायला हवे होते. पण तेथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत.(Ravet News) तसेच वाहनचालकांच्या सोईसाठी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन्स नेमण्याची गरज होती. तसेच मनपाने यासाठी तेथे सूचनाफलक लावायला हवे होते. या सर्व उपाय योजना मनपा ने न केल्यामुळे वाहनचालकांना आज दिवसभर त्रास सहन करावा लागला.

याबाबत अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभ्यंता, पाणी पुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून काल चौकाजवळ होणारी पाणी गळती थांबवण्यासाठी तेथून मनपाची मुख्य पाईपलाईन जात असल्याने ती गळती रोखने गरजेचे होते. पण तेथे दिवसा खूप वाहतूक असल्याने काल रात्री काम करण्यास सुरूवात करण्यात आली असून संध्याकाळ पर्यंत दुरुस्तीचे पुर्ण करण्यात आलेले आहे.” मात्र या खोदकामामुळे दिवसभर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.