YCMH : मृतदेह अदलाबदलीची अतिरिक्त आयुक्त करणार चौकशी, सात दिवसात येणार अहवाल – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूगाणालयातील शवविच्छेदनगृहातून (डेडहाऊस) मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे.(YCMH) याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. ही समिती सात दिवसात अहवाल देईल. यात दोषी असलेल्यांवर निश्चित कारवाई करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दापोडीतील स्नेहलता अशोक गायकवाड यांचा सीमाभिंत अंगावर पडल्याने उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात कोल्ड स्टोरेज नसल्याने मृतदेह वायसीएममधील डेडहाऊसमध्ये ठेवला होता. आज सकाळी शवविच्छेदन केले.(YCMH) नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी गेले असता लेबल वर स्नेहलता यांचे नाव होते. परंतु, त्यांचा मृतदेह नव्हता. त्यानंतर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी  अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Ganesh Bidkar : पवार कुटुंबीयांनी केवळ ओरबडण्याचा उद्योग केला : गणेश बिडकर

याबाबत विचारले असता आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”मृतदेह अदलाबदलीची घटना दुर्देवी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांनी वायसीएमला भेट देवून सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. (YCMH) समितीला सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळणा-यांवर निश्चित कारवाई केली जाईल. वायसीएमएचमधील प्रक्रिया सुलभ, सहज सोपी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डॉ. वाबळे यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायसीएमच्या कार्यप्रणालीत सुधारणा केली जाईल”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.