Hinjwadi : विवाहितेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ 

पती, सासू, सास-या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  विविध कारणांवरुन विवाहितेला क्रूर वागणूक देऊन मानसिक, आर्थिक शारीरिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू, सास-याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याप्रकरणी पती अमेय रवींद्र मडकईकर (वय 37), सासू नमिता रवींद्र मडकईकर आणि सासरे रवींद्र मडकईकर (वय 66, सर्व रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 35 वर्षीय विवाहित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून फिर्यादी महिलेला पती, सासू आणि सासरे  वेगवेगळ्या कारणावरुन क्रूर वागणूक देत होते. मानसिक, आर्थिक, शारीरिक छळ करत होते. छळ करत मारहाण व शिविगाळ केली. हाताने, बॅटने मारहाण करुन दुखापत केली. तसेच सासरे रवींद्र मडकईकर यांनी कारच्या ‘अॅक्सिडेंटल इन्शुरन्स’ क्लेम फॉर्मवर फिर्यादीच्या खोट्या सह्या घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.