Chikhali : पैशांसाठी विवाहितेचा छळ 

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे, वॉशिंग मशिन,  फ्रीज आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, दीर, नंनदेवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती रामरतन शिवाजी सावंत (वय 32), सासू सुकुमारी शिवाजी सावंत, सासरे शिवाजी तुकाराम सावंत, दीर राजकुमार शिवाजी सावंत, देविदास सावंत, नंनद लताबाई आणि रामरतन याचा मामा असे सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करुन विवाहितेला माहेरहून पैसे, वॉशिंग मशिन,  फ्रीज आणण्याचा तगादा लावला. शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी गरोदर असताना त्यांना जबरदस्तीने कोणत्यातरी गोळ्या खाण्यास घालून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.