Pimple Gurav News : ‘पोलिसांत तक्रार देऊन माझी व घरच्यांची इज्जत घालवलीस’ असे म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – ‘तु माझी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यामुळे माझी व घरच्यांची इज्जत घालवली. तु माझ्याशी लग्न कर माझे घरचे लग्न करायला तयार आहेत.’ असे म्हणून महिलेशी झटापट केली. तसेच शिवीगाळ करून घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (दि.11) रात्री 9.15 ते 9.40 या वेळेत पिंपळे गुरव येथे ही घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय संजय मुरकुटे (रा. औंध, बाणेर) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या त्यांच्या मित्रासोबत कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी बसलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला व  ‘तु माझ्याशी लग्न कर. यापूर्वी तु माझी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यामुळे माझी व घरच्यांची इज्जत घालवली. माझे घरचे लग्न करायला तयार आहेत. माझी आई खूप आजारी असते तु तिला समजून घेऊ शकतेस’ असे म्हणून फिर्यादीचा हात धरून अंगाला झटापट केली. तसेच कॅफे बाहेर ओढत घेऊन जात जबरदस्तीने गाडीवर बसवले. गाडी फिर्यादीच्या घराजवळ घेऊन जात रस्त्याच्या मधोमध थांबवून फिर्यादीला शिवीगाळ करून घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.