Nigdi News : कमी गुण मिळाले म्हणून रागावलेल्या आईने मुलीला कात्रजला जाणा-या बसमध्ये सोडले आणि…

एमपीसी न्यूज – शाळेत कमी गुण मिळाले म्हणून रागावलेल्या आईने मुलीला कात्रजला जाणा-या बसमध्ये सोडले. त्यानंतर या मुलीचे अपहरण झाले अशी तक्रार निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. भक्ती शक्ती चौक, निगडी येथील अण्णाभाऊसाठे पीएमपीएल जंक्शन बस स्टॉप येथे निगडी ते कात्रज जाणा-या बसमध्ये 05 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली.

याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची 16 वर्षीय मुलगी हिला शाळेत कमी गुण मिळाले म्हणून त्या तिच्यावर रागवल्या. त्यानंतर फिर्यादी महिलेने स्वत: मुलीला पीएमपीएल जंक्शन बस स्टॉप येथून निगडी ते कात्रज जाणा-या बसमध्ये बसवले. त्यानंतर अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केले असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.