Pimple Saudagar : शिवार चौक ते छत्रपती युवा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रोड वरील शिवार चौक ते छत्रपती युवा चौक पर्यंत रस्त्याच्या (Pimple Saudagar) कामाची निविदा प्रसिध्द करावी. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली.

पालिका स्थापत्य प्रकल्प अधिकारी व सल्लागार कंपनी यांच्या सोबत काटे यांनी आज बैठक घेतली. कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपीनीचे सल्लागार लक्ष्मीकांत पतंगे, रणजित कोल्हे उपस्थित होते.

Pune : महसूल सप्ताहानिमित्त होणार नाविन्यपूर्ण कार्यक्रम

या कामामध्ये पूर्वी असलेल्या संपुर्ण ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन नविन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी 1 ते 1.5 वर्षांचा  कालावधी लागणार आहे. या

रस्त्यावर वाहनाची व नागरिकांची वर्दळ जास्त असल्याने या रस्त्याचे काम दोन टप्यात करण्यात येणार असून नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणुन वाहतुकीसाठी नविन तात्पुरते स्वरूपात पर्याय देखील उपल्बध करून (Pimple Saudagar) देण्यात येणार असल्याचे काटे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.