Pimple Saudagar : योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच नागरिकांसाठी खुले होणार

एमपीसी न्यूज – रहाटणी ,पिंपळे सौदागर येथील (Pimple Saudagar)  छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन तसेच नागरिकांसाठी साकारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा व बहुउद्देशीय योगा पार्क उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच नागरिकांसाठी खुले होणार असल्याचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहाणीनंतर सांगितले.

शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डनमध्ये ओपन जिमचे तसेच लहान मुलांचे खेळण्यांचे साहित्य, बसण्याचे बाक बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त व तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना व मुलांना जिमचा व खेळण्यांचा आनंद घेता येत नाही. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे ही सर्व व्यायामाचे साहित्य व खेळणी दुरुस्त करण्याच्या सूचना यावेळी काटे यांनी केल्या असून त्यानुसार उद्यान विभागातर्फे झोके तसेच बदक खेळणी तात्काळ दुरूस्त करण्यात आले. तसेच उर्वरित साहित्य देखील लवकरात लवकर दुरूस्त करण्यात येतील असे आश्वासन संबधित उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काटे यांना दिले.

Maval : विणेकरी हा दिंडीचा आत्मा आहे – पुरुषोत्तम मोरे

त्याचबरोबर याच भागातील योगा पार्क उद्यानाच्या कामाला गती देऊन काम (Pimple Saudagar) लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशा सूचना यावेळी नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बहुउद्देशीय व आत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या उद्यानामध्ये लहान मुलासाठी क्लायमबिंग वॉल, स्केटिंग, योगा, प्रशस्त गार्डन, वाकिंग ट्रॅक असे वैशिष्ट्ये असलेले योगा पार्क काही दिवसात पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येईल नाना काटे यांनी सांगितले.

यापाहणीवेळी उद्यान स्थापत्य विभागाचे उपअभियंता मोरे साहेब,कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे, प्राजक्ता गव्हाणे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, सहाय्यक उद्यान निरीक्षक खैरे ,स्मार्ट सिटीचे रोहित पाटील, धनराज स्वामी, प्रविण जाधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.