PimpleGurav : शब्दधन काव्य मंचच्या वतीने आकुर्डीत शनिवारी काव्य पुरस्कार

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्य मंचच्या वतीने 20 व्या काव्यपुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ आकुर्डी येथे शनिवारी (दि.17 ऑगस्ट) होणार आहे, अशी माहिती शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली.

आकुर्डी येथील बीना इंग्लिश स्कूलमध्ये सकाळी नऊ वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीना एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल खान असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे असणार आहे.

  • शब्दधन काव्यमंचचे काव्यपुरस्कारात राज्यस्तरीय शब्दप्रतिभा पुरस्कार कवीवर्य माधव पवार, गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार प्रा. तुकाराम पाटील, अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार कवी निशिकांत गुमास्ते, छावा काव्य पुरस्कार कवी देवेंद्र गावंडे, छावा काव्य पुरस्कार आत्माराम हारे. छावा काव्य पुरस्तार कवी सोमनाथ टकले, छावा काव्य पुरस्कार समृध्दी सुर्वे यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.