Pimpri : शब्दधन काव्य मंचच्या वतीने अशोक कोठारी यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – “चला जाऊ जेष्ठ साहित्यिकाच्या घरी” या उपक्रमाअंतर्गत शब्दधन काव्य मंचच्या वतीने मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. जयश्री राजेंद्र घावटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते हा सत्कार सोहळा झाला.

यावेळी जयश्री घावटे म्हणाल्या की, “कविता ही हृदयाची भाषा आहे. अंतर्मनाला खोलवर साद घालून जन्म घेतलेली कविता रसिक मनाचा ठाव घेते. काव्याच्या सर्वच प्रकार कोठारी यांच्या तरल लेखणीतून प्रकट झालेले दिसतात. म्हणूनच ते साहित्य विश्वातील आगळे मुसफिर आहेत.”
प्रा. तुकाराम पाटील आणि कवी पितांबर लोहार यांनी अशोक कोठारी यांच्या “हंस मानसीचा ” आणि ” माझ्या मनाच्या अंतरी ” या काव्यसंग्रहातील कवितांचे रसग्रहण केले.

  • यावेळी काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, माधुरी ओक, शोभा जोशी, सुहास घुमरे, दीपेश सुराणा, सुप्रिया सोळंकुरे, आय. के. शेख, डॉ. पी. एस. आगरवाल, नंदकुमार कांबळे, दिनेश भोसले, अनिल दीक्षित, संपत शिंदे, सविता इंगळे, बाळासाहेब घसते, वर्षा बालगोपाल, राजेंद्र घावटे, विष्णू जोशी आदी उपस्थित होते.

जयश्री घावटे पुढे म्हणाल्या की, “अशोक कोठारी यांच्या कविता भावनाप्रधान, तरल अनुभूतीच्या हळुवार शब्दांनी गुंफल्या आहेत. त्यातून त्यांची चिंतानशीलता आणि आयुष्याकडे निरपेक्ष पणें पाहण्याची वृत्ती दिसून येते. आपल्या मनालाच मित्र माणून त्याच्याशी कधी अवखळ पणे, कधी खट्याळपणे, कधी वेदनेची तर कधी संवेदनांची हितगुज साधण्याची किमया ते करतात. त्यांच्या कविता शब्दभंबाळ न बनता एखाद्या कुंचल्यातून सुंदर चित्र बाहेर यावे इतक्या सृजनशील आहेत. म्हणूनच अशा कविता अलगद, अलवार असून मनावर गारुड करतात. त्यातून उमटलेले भावनांचे तरंग अंतर्मुख बनवून जातात.”

  • यावेळी आय. के. शेख, धनेश बडवाने, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, दीपेश सुराणा, रघुनाथ पाटील, निशिकांत गुमास्ते आदींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मुरडे यांनी केले. तर, सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आभार तानाजी एकोंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.