BNR-HDR-TOP-Mobile

PimpleGurav : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा

एमपीसी  न्यूज – पिंपळे गुरव येथील कै गणपतराव जगताप महिला बचत गटाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ महिला  मेळावा घेण्यात आला. 
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर शकुतंला धराडे, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, माजी महापौर मंगला कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नवनाथ जगताप, माजी नगरसेविका शोभा अदियाल  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच सर्व पदाधिकरी उपस्थित होते.
महिलांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, “महिलांची सुरक्षा वा-यावर आहे. सत्ताधारी नुसते बोलबाला करतात पण त्याबाबतीत निर्णय काही घेत नाहीत. त्यामुळे निवडणुकीत परिवर्तन व्हायला हवे आणि ते तुमच्या हातात आहे”
मेऴाव्याचे आयोजन कै. गणपतराव महिला बचतगट पिंपळे गुरव व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले.
HB_POST_END_FTR-A2

.