Pimpri : विद्यापीठ अंतर्गत स्कॅम स्पर्धेत एसबीपीआयएमचा द्वितीय क्रमांक

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्कॅम 2018’ या स्पर्धेत एसबीपीआयएमच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय  क्रमांक पटकाविला. विद्यापीठ अंतर्गत असणा-या साठहून जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 

विद्यार्थ्यांनी हिंजवडी येथील सिम्बॉयोसिस सेंटर फॉर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे ही स्पर्धा घेण्यात आली. ‘बिझनेस क्राइम इन्वेस्टीगेशन’ या गटात व्दितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पारितोषिक मिळविणा-या एसबीपीआयएमच्या मिथून माधव, स्नेहल रावले, वैष्णवी मेनन, किशन यादव, एैश्वर्या नारोथ यांचा संस्थेचे संचालक डॉ. डॅनीअल पेनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. हंसराज थोरात, डॉ. काजल माहेश्वरी उपस्थित होते.
      डॉ. पेनकर यांनी यावेळी सांगितले की, निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी संस्था वेळोवेळी देशातील व परदेशातील उच्चशिक्षित व अनुभवी मार्गदर्शकांचे व्याख्यान, चर्चासत्रे, शिबीरे आयोजित करीत असते. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसित होते. असे डॉ. पेनकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.