Pimpri: शहरात एका पॉझिटीव्ह रुग्णाची भर ; पावणे आठ लाख नागरिकांचे सर्वेक्षण,  1887 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील सात लाख 75 हजार 670  नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर,  परदेशातून आलेल्या 1887 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंत शहरात 22 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण बरे झाले आहेत. दहा सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,  शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत आज नवीन एकने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 10 झालेली आहे. 

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 627 व्यक्तींचे घशातील द्रावांचे नमुने कोरोना तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर 565 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  तर, आज (गुरुवारी) 40 संशयितांना वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत आज नवीन एकने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 10 झालेली आहे. त्यामुळे शहरामध्ये आजपर्यंत एकुण 22 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यापैकी 12  रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित 10 रुग्ण महापालिकेच्या  रुग्णालयात दाखल असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खराळवाडी, थेरगाव, चिखली, दिघी परिसर सील केला आहे. या भागातील सरकारी व खासगी बँकांच्या शाखा देखील बंद  राहतील. केवळ एटीएम केंद्रांची सुविधा कार्यान्वीत राहील.

आजचा वैद्यकीय  अहवाल

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 40

#पॉझिटीव्ह रुग्ण – 1

#निगेटीव्ह रुग्ण – 7

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 40

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 40

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 24

#कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 22

#सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या – सात लाख 75 हजार 670

#होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या – 1887

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.