Pimpri: ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी 10 हजार पोस्टर्स छापणार

एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी 10 हजार पोस्टर्सची निविदा न मागविता त्यांची थेट पद्धतीने छपाई करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च होणार आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा पिंपरी – चिंचवड शहरातील आकडा बारावर पोहोचल्याने शहरात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. महापालिका वैद्यकीय विभागामार्फत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधाकरिता घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना याबाबत विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

त्यासाठी पोस्टर्स छपाई करून घेण्यासाठी महापौर उषा ढोरे यांनी सुचना केल्या आहेत. त्यानुसार, दहा हजार पोस्टर्स तातडीने छपाई करण्याची मागणी भांडार विभागाकडे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी ही पोस्टर्स छपाई तातडीने करून घेणे आवश्यक आहे.

हे पोस्टर्स 1 हजार 445 रूपये प्रति शेकडा या दराने आकुर्डी येथील विजय प्रिंटर यांच्याकडून निविदा न मागविता थेट पद्धतीने छपाई करून घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.