Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये 14 लाख 76 हजार मतदार

एमपीसी न्यूज – शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघ (Pimpri) आणि भोर मतदार संघातील काही भाग असे 14 लाख 76 हजार 418 मतदार आहेत. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ असून सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत.

जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 वर गेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदारयादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्यांमध्ये बदल, आदी कामे केली जाणार आहेत.

Gahunje : विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था
तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार (Pimpri)यादीवर 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. 26 डिसेंबरला दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 5 जानेवारी 2024 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हीच यादी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम असणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघ हा जिल्ह्यात सर्वाधिक संख्येचा संघ आहे. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात चौथ्या स्थानावर आहे. मार्च 2023 मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. तर गेल्या आठ महिन्यात तिन्ही विधानसभा मतदार संघात 39 हजार 35 मतदार वाढले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 85 हजार 731 मतदार आहे. त्यात 3 लाख 11 हजार 528 पुरुष, 2 लाख 74 हजार 167 महिला आणि 36 इतर मतदार आहेत. पिंपरीत 3 लाख 63 हजार 829 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 89 हजार 599 पुरुष, 1 लाख 69 हजार 588 महिला आणि इतर 20 मतदार आहेत. तर, भोसरीत 5 लाख 26 हजार 858 मतदार आहेत. त्यामध्ये 2 लाख 37 हजार 374 पुरुष, 2 लाख 89 हजार 397 महिला आणि 85 इतर मतदार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 14 लाख 76 हजार 418 मतदार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.