Pimpri: आनंदनगर, भाटनगर, सांगवी, किवळेतील 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; येरवड्यातील महिलेचा YCMH मध्ये मृत्यू

Pimpri: 14 people from Anandnagar, Bhatnagar, Sangvi, Kiwale reported positive; Woman from Yerwada dies in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह भाटनगर, सांगवी किवळे परिसरातील 8 पुरुष आणि 6 महिला अशा 14 जणांचे आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, कोरोना संशयित 248 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. शिवाय येरवड्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, येरवड्यातील कोरोना बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

महापालिकेने कोरोना संशियतांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीसह भाटनगर, सांगवी किवळे परिसरातील 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात 8 पुरुष आणि 6 महिलांना कोरोनाची बाधा झाला आहे.  तर, शहरातील कोरोना संशयित 248 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

याशिवाय येरवड्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, येरवड्यातील कोरोना बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.  यामुळे शहरातील सात आणि शहराबाहेरील 10 अशा 17 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील 367 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय 190 रुग्णांवर आजमितीला उपचार सुरु आहे. त्यातील 167 रुग्णांवर वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी तर शहरातील 23 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 170 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, शहरातील 7 जणांचा आणि शहराबाहेरील 10 अशा 17 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 107
# पॉझिटीव्ह रुग्ण – 14
#निगेटीव्ह रुग्ण – 248
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 202
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 392
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 249
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 367
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 190
# शहरातील कोरोना बाधित 23 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  17
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 170
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 31459
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 90944

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.