Pimpri : पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी भरगच्च कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त (Pimpri ) रविवारी (10 सप्टेंबर) रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 या वेळेत पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजय उलपे व पदाधिकाऱ्यांनी दिली.

यानिमित्त पारंपरिक गण जागरण गोंधळ, महाराष्ट्राची लोकधारा, जादूचे प्रयोग (जादूगार रघुराज), लावणी महोत्सव (सुरेखाताई पुणेकर, छायाताई खुटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती), ट्रिब्यूट टू रवींद्र जैन संगीत रजनी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक रामचंद्र कड यांना जीवनगौरव पुरस्कार, माजी नगरसेवक शशिकांत कदम यांना समाजभूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार, (Pimpri )भाजपाचे नेते रामशेठ गावडे यांना समाजसेवक पुरस्कार, ज्येष्ठ तमाशा कलावंत दिलीप धुळेकर यांना तमाशा कला गौरव पुरस्कार, गायिका साधना मेश्राम यांना दिवंगत कवी हरिनंद रोकडे स्मृती पुरस्कार, गणेश खंडागळे यांना आरोग्य मित्र पुरस्कार, मिठू पवार यांना कला मित्र पुरस्कार, गीतकार हरिदास कड यांना उत्कृष्ट गीतकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

तसेच कला गौरव पुरस्काराचेही वितरण होणार आहे. शिवशाहीर बाळासाहेब काळजे, दत्तात्रय शिंदे, आशा तेलंग, अर्चना सावंत, चित्रसेन भवार, दिगंबर गरुड, रुपाली पाथरे, आरती चतुर्वेदी, दिलीप घोडे, प्रकाश सुतार, विनायक कडवळे, सुनील पाटील, राजेंद्र ताम्हाणे, डॉ. श्रीधर मोरे यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेत्री जयमालाताई इनामदार, ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते वसंतराव अवसरीकर, ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी छायाताई खुटेगावकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते अशोककुमार सराफ, निर्माते सुबोध चांदवडकर, ज्येष्ठ तमाशा फड मालक रघुवीर खेडकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri : नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, महापालिका आयुक्तांचे आवाहन

कार्यक्रमाला आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, बसपाचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेशभाई चलवादी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड, लोककला अभ्यासक बाबाजी कोरडे, वसंतराव जगताप, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष अण्णा कसबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.