Pimpri : पवनाथडी जत्रेच्या सभा मंडपासाठी 32 लाखाचा खर्च 

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 4 ते  8 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेच्या मंडपासाठी 32 लाखाचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर आयत्यावेळी दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला आणि बालकल्याण योजने अंतर्गत या जत्रेमध्ये महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटींग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होवुन महिला आर्थिक दृष्ट्‌या सक्षम व्हाव्यात यासाठी  पालिकेमार्फत दरवर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा जत्रेचे 12 वे वर्ष असून सांगवीतील पी. ड्‌बल्यू. डी. मैदानावर पवनाथडी जत्रा 4 ते  8 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

पवनाथडी जत्रेची सभा मंडपव्यवस्था आणि इतर व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदेची रक्कम 32 लाख 40 हजार रुपये होते. त्यासाठी चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. शालीमार मंडप डेकोरटर्स, निकीता एसबीएस सहकारी संस्था, स्वामी समर्थ केटरर्स अँड डेकोरेटर्स आणि ओम्कार ग्रुप अशा चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. यापैकी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा 30.5 टक्के कमी दराने आली. निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार काम करण्यास सक्षम असल्याने शहर अभियंत्यांनी 31 डिसेंबर रोजी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा स्वीकारली आहे. त्यांच्याकडून 22 लाख 66 हजार 941 रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.