Pimpri: शहरात 7115 सक्रिय रुग्ण; 80 रुग्ण गंभीर, 51 जण व्हेंटिलेटरवर

Pimpri: 7115 active patients in the city; 80 patients critical, 51 on ventilator 10 मार्चपासून शहरातील 19, 854 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 12 हजार, 400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या वाढत असून त्याबरोबरच सक्रिय, लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आजमितीला 7115 सक्रिय रुग्ण असून त्याचे प्रमाण 35.83 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातील 80 जणांची प्रकृती गंभीर आहे. 51 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 12 हजार 400 रुग्णांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. त्याचे प्रमाण 62.45 टक्के आहे. आजपर्यंत 339 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून मृत्यूदर 1.70 टक्के आहे. दरम्यान, शहरातील 19, 854 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती.

परंतु, त्यानंतर शहरातील रुग्ण संख्येत प्रचंड झपाट्याने वाढ होत आहे. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोरोनाने संपूर्ण शहराला व्यापले आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

गृहनिर्माण सोसायाट्यांच्या भागात सध्या रुग्णवाढ होताना दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. दररोज कमालीची रुग्णवाढ होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

10 मार्चपासून शहरातील 19, 854 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 12 हजार, 400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचे प्रमाण 62.45 टक्के आहे.

तर, 7115 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 3209 बाधितांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

767 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून 80 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 51 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.83 टक्के आहे. तर, 339 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. त्याचे प्रमाण 1.70 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.