Hinjawadi: किराणा दुकान फोडून 25 हजारांची रोकड लंपास

Hinjawadi: rs 25 thousand cash stolen from grocery store फिर्यादी चव्हाण यांचे पुनावळे येथे गुरुदत्त प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान कुलूप लाऊन बंद केले होते.

एमपीसी न्यूज – किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना 28 जुलै रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

नितीन शिवाजी चव्हाण (वय 34, रा. पुनावळे, माळवाडी जांबे रोड, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांचे पुनावळे येथे गुरुदत्त प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान कुलूप लाऊन बंद केले.

मंगळवारी पहाटे अडीच ते तीन या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी कागदपत्रे आणि 25 हजारांची रोकड चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.