Pimpri : गावठी दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – गावठी दारू विक्री प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri) एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. 11) रात्री लक्ष्मी धर्मशाळे शेजारी पिंपरी येथे करण्यात आली.

सुनील मधुकर काळे (वय 55, रा. लक्ष्मी धर्मशाळे शेजारी पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास रेड्डी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

Pimpri : काेट्यवधी खर्चूनही वृक्षगणना अहवाल प्रसिध्द नाही; माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या घरामध्ये 3500 रुपये किमतीची 70 लिटर गावठी दारू साठवून ठेवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी काळे यांना नोटीस बजावली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.