Pimpri : प्रबोधन पर्वात वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी ( Pimpri ) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीजवळील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. नागरिकांनी दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून महामानवांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा जागर केला.

गुरूवारी सकाळी स्थानिक कलावंताच्या गीतगायनाने दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली. विविध समाजप्रबोधनपर गीते सादर करून स्थानिक कलावंतांनी महापुरुषांना मानवंदना दिली. त्यानंतर ब्लू मून एंटरटेन्मेंट प्रस्तुत, विजय गायकवाड लिखित आणि राजपाल वंजारी निर्मित “कांबळेची वरात” या समाज प्रबोधनपर धमाल विनोदी नाटकाने उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडले. विनोदासोबत सामाजिक संदेश देण्याचे काम या नाटकाच्या माध्यमातून विजय गायकवाड आणि राजपाल वंजारी यांनी केले.

Alandi : विद्यार्थ्यांनी केली इंद्रायणी घाटाची स्वच्छता

दुपारी कुणाल बोदडे आणि सा.रे.ग.म.पा फेम रागिणी बोदडे यांची वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रागिणी बोदडे आणि कुणाल बोदडे यांनी महापुरूषांचे विचार विविध गीतांच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले आणि आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर सुप्रसिद्ध कव्वाल सुरज आतीश, विशाल वाकोडे, स्नेहल वानखेडे आणि सहकाऱ्यांचा प्रबुद्ध हो मानवा हा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेजस्वी विचार विविध गीतांच्या माध्यमातून कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले आणि रसिकांची वाहवा मिळविली.

सायंकाळी काव्य संगीताद्वारे युगप्रवर्तकांना आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ गायक तथा कवी ललकार बाबु, नांदेड येथील मानकर बाबु कव्वाल, यवतमाळ येथील कमलेश पाटील, वर्धा येथील सुदेश कांबळे यांनी काव्य संगीताद्वारे रसिकांची मने जिंकली. त्यानंतर संकल्प गोळे यांचा अभिवादनपर गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड गीतकार तथा शायर प्रणय सतलज यांचा विशेष सहभाग होता. या कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

संध्याकाळी स्वरांचे बादशहा विजय सरतापे यांच्या प्रबोधनाची भीम सरगम या गीतगायनाच्या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. या स्वरसंध्येत प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि महामानवांच्या विचारांचा जागर ( Pimpri ) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.