Pimpri : रस्त्यावर थांबलेल्या तरुणास कोयत्याने मारहाण

Pimpri: A young man standing on the road was beaten with a scythe

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबलेल्या एका तरुणास चार जणांनी कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पिंपरीतील रिव्हर रोड येथे शनिवारी (दि. 6) सायंकाळी घडली.

सोनू बबन शिरसाठ (वय 30, रा. सोनार गल्ली, रिव्हर रोड, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पप्पू ऊर्फ महेश मदन शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी), तन्वीर शेख (वय 30, रा. काळेवाडी पोलीस चौकीच्या मागे, काळेवाडी) आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी सोनू हे आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीची वाट पाहात आंबेडकर कॉलनी येथील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चार आरोपी तिथे आले. त्यातील आरोपी पप्पू याने फिर्यादी सोनू यांना धक्‍काबुक्‍की करीत ‘तू सारखा आमच्या कॉलनीत येतोच कशाला, तू भाई झाला आहे काय’, असे म्हणत हातातील उलट्या कोयत्याने मारहाण केली.

आरोपी तन्वीर याने सिमेटच्या गट्टूने तोंडावर मारहाण केली. तसेच इतर दोन आरोपींनी ‘आज याला सोडायचे नाही’, असे म्हणत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.