Pimpri : 247 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई ; 37,050 रूपये इतका दंड वसूल

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.16) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 247 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानुसार आज एकूण रूपये 37,050 रूपये इतका दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या कडून प्रतिव्यक्ती 150 दंड वसूल करण्यात येत आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 247 व्यक्तींकडून रूपये 37050 इतका दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.