Pimpri: दिवसभरात 127 नवीन रुग्णांची भर; 145 जणांना डिस्चार्ज, चौघांचा मृत्यू

Adding 127 new patients throughout the day; 145 discharged, four Death

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 120 आणि महापालिका  हद्दीबाहेरील  7 अशा 127 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  अण्णासाहेब नगर, चिंचवड येथील 35 वर्षीय युवक, इंदिरानगर, चिंचवड 75 वर्षीय वृद्ध, खडकी बाजार येथील 59 वर्षीय महिला आणि मुंबईतील 58 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3029 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील भीमनगर पिंपरी, बौध्दनगर निगडी, संजयनगर निगडी, चंद्रलोक बिल्डिंग निगडी, पिंपळेनिलख, गांधीनगर खराळवाडी,निगडी प्राधिकरण, समर्थचौक वाकड, रुपीनगर, यमुनानगर, संतोषनगर थेरगांव, भोसले चाळ नेहरुनगर, चक्रपाणीरोड भोसरी, साईपार्क नेहरुनगर,दिघीरोड भोसरी,पटेलगार्डन जुनी सांगवी,  गवळीनगर भोसरी, जवळकरनगर कासारवाडी,पेशवेनगर कासारवाडी, भारतमातानगर दिघी, महेंद्रा खराळवाडी, गंगास्काईज पिंपरी, विजयनगर काळेवाडी, संततुकारामनगर  पिंपरी, महात्माफुलेनगर भोसरी, आदर्शनगर काळेवाडी, इब्राहिम मशिद कासारवाडी, तापकिरनगर काळेवाडी, सुदर्शननगर वाकड, सुदर्शननगर पिंपळे गुरव, टोलनाका मोशी, भंडारी पेट्रोल पंप कासारवाडी, लांडेनगर भोसरी, गुळवेवस्ती भोसरी, राजीवगांधी वसाहत नेहरुनगर, आळंदीरोड भोसरी, पवारवस्ती चिखली, शितलबाग भोसरी, जैनमंदिर भोसरी, इंद्राणीनगर भोसरी, धावडेवस्ती  भोसरी, प्रेमलोकपार्क,  आंबेडकर कॉलनी पिंपरी, कालभैरव सोसायटी निगडी, भाटनगर पिंपरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोनिका बिल्डींग पिंपरी,  वाल्हेकरवाडी,  शेडगेवस्ती   वाकड, विनोदेनगर वाकड, भुमकरचौक थेरगांव, अशोकनगर पिंपरी, आदर्शनगर पिंपरी,  केशवनगर कासारवाडी, संतज्ञानेश्वर कॉलनी काळेवाडी, चैत्रबन सोसायटी सांगवी, नटराज सोसायटी नेहरुनगर,  मोरेवस्ती चिखली,  हनुमान मंदिर  पिंपरी, बिजलीनगर, तानाजीनगर चिंचवड, गांधी वसाहत, जोतिबानगर काळेवाडी, आळंदीरोड भोसरी, मासुळकर कॉलनी पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, शास्त्रीचौक भोसरी, आधारनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, जयभीमनगर दापोडी, नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी, बोपखेल, संभाजीनगर परिसरातील 120  जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 38 पुरुष आणि 82 महिलांचा समावेश आहे.

तर, सासवड,बावधन,देहूगांव,बोपोडी येथील 4 पुरुष आणि 3 महिला अशा 7 जणांनाही  कोरोनाची बाधा झाली.  त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, पिंपरी, रामनगर चिंचवड, अजंठानगर, बोपखेल, अंकुशचौक  निगडी, विठ्ठलनगर, सिध्दार्थनगर दापोडी,शिवक्लासिक मोशी, च-होली,  आकुर्डी,  सुदर्शनगर चिंचवड, लिंकरोड पिंपरी,  पिंपळेगुरव,  भाटनगर, फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी, तापकिरनगर काळेवाडी, दिघीरोड भोसरी,  डिलक्समॉल, काळभोरनगर चिंचवड, काटेपुरम सांगवी,  शास्त्रीचौक भोसरी, मधुबन सांगवी, मिलिंदनगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, डुडुळगांव, वैदुवस्ती पिंपळेगुरव, रामनगर रहाटणी, वरदहस्त पिंपरी, महात्मा फुलेनगर भोसरी, गांधी वसाहत नेहरुनगर,  नेहरुनगर,  व्यंकटेशपार्क थेरगांव, नेहरुचौक दापोडी, बिजलीनगर,  पंचशिलनगर, भारतमातानगर दिघी, सेक्टर चार मोशी, लिंबोरेवस्ती  दापोडी, मोरवाडी, नानेकरचौक चिखली,  कामगारनगर पिंपरी, कासारवाडी, नितेशनगर पिंपरी, पाटीलनगर चिखली, ग्रीन एन्मायर चिखली, भोईआळी चिंचवडगांव, संभाजीनगर भोसरी, एच.डी.एफ.सी.कॉलनी चिंचवड,  क्रांतीनगर आकुर्डी, जयभीमनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी,  बौध्दनगर पिंपरी, पंचतारानगर आकुर्डी, अष्ठविनायक कॉलनी काळेवाडी, संभाजीनगर चिंचवड, इंदिरानगर चिंचवड, जाधवचौक दापोडी, चक्रपाणी वसाहत भोसरी, तापकिरनगर मोशी, भवानीनगर पिंपळे गुरव, गांधीनगर खराळवाडी, हनुमानगर चिखली, रमाबाईनगर पिंपरी, सोनिगरा चिंचवड, दत्तमंदिर वाकड, वल्लभनगर पिंपरी,  इंद्रायणीनगर चिंचचवड, टिळकनगर थेरगांव, नखातेनगर थेरगांव, देहूरोड,  रहाटणी, विश्रांतवाडी,  क्रांतीनगर आळंदी,  खडकी,  बोपोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 3029  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1862  जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 47 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 30 अशा 77 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1116 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 886

# पॉझिटीव्ह रुग्ण – 127

#निगेटीव्ह रुग्ण – 305

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1211

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2411

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 434

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 3029

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1116

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  77

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1862

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26608

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 84731

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like