Pimpri : अतिरिक्त आयुक्त (एक) पाटील यांच्याकडे 17 तर अतिरिक्त आयुक्त (दोन) पवार यांच्याकडे 16 विभाग

अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक आणि दोन अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाटप केले आहे. अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष पाटील यांच्याकडे स्थापत्य, शिक्षणासह 17 विभाग ठेवले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे आरोग्य, भांडारसह 16 विभाग सोपविले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 39 -ए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. एक प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांसाठी तर दुसरे पद स्थानिक अधिका-यासाठी राखीव आहे. परंतु, दोन्ही पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकारीच कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्त (एक) या पदावर संतोष पाटील कार्यरत आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त (दोन) या पदावर अजित पवार नुकतेच रुजू झाले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोघांकडे विभाग सोपविले आहेत.

अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष पाटील यांच्याकडे ‘हे’ आहेत विभाग

स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण मंडळ, प्राथमिक शिक्षण विभाग, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, वैद्यकीय विभाग, वायसीएमएच्, विद्युत मुख्य कार्यालय, कार्यशाळा विभाग, झोनिपू, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नागरवस्ती विकास योजना विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग, स्थापत्य प्रकल्प, बीएसयुपी, ई्ड्ब्लयूएस प्रकल्प, बीआरटीएस प्रकल्पाचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडील विभाग

आरोग्य विभाग, स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानसह), निवडणूक, जनगणना (आधारसह), पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, सुरक्षा विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, स्थानिक संस्था कर, मध्यवर्ती भांडार विभाग, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), भूमी आणि जिंदगी, क्रीडा विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग, सभाशाखा हे विभाग त्यांच्याकडे देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.