Talegaon Dabhade : तालुकास्तरीय खो – खो स्पर्धेत कृष्णराव भेगडे शाळेच्या मुलींचे वर्चस्व

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय व नामदार संजय बाळा भेगडे ग्रुप मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो – खो स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात कृष्णराव भेगडे शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.

या संघाच्या विरुद्ध व्ही.पी.एस.लोणावळा हा संघ होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले.तर १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचा तृतीय क्रमांक आला.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक गोरख काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे, संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे , अध्यक्ष संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी अभिनंदन केले व पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.