BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मनसेसोबत युती करणार का ? आदित्य ठाकरे म्हणतात…..

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात सभा घेऊन जोरदार प्रचार करत आहेत. कालपर्यंत त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. परंतु, मुंबईतील सभेत त्यांनी शिवसेनेवर देखील टीका करत त्यांना मतदान करु नका, असे आवाहन केले आहे.

त्यातच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना भविष्यात निवडणूक लढवाल तेव्हा मनसेसोबत युती कराल का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य म्हणाले, “तुमच्या सारखे तरुण आपल्यासोबत असल्यावर दुस-याची आवश्यकता आहे का?, ज्यांचे ध्येय, विचार, प्रत्येक वर्षी बदलत नाहीत. त्यांच्यासोबत युती करु शकतो. शिवसेना-भाजपची युती देशहित डोळ्यासमोर ठेवून झाली आहे. 25 वर्षांची ही युती आहे. मतभेद जरुर आहेत. पण, ध्येय एक आहे. ते म्हणजे देशहित. ज्यांचे मन स्थिर आहे. त्यांच्यासोबत दिलसे जाऊ” असे सांगत त्यांनी आपले काका राज ठाकरे यांना टोला लगाविला.

पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.24)’आदित्य संवाद’चा कार्यक्रम झाला. तरुणांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. तरुणांसोबत सेल्फी घेतला. तरुणांचा सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांची मने जिंकली.

HB_POST_END_FTR-A2

.