Pimpri : महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी अ‍ॅड. आगरकर तर, महिला शहराध्यक्षपदी वंदना जाधव

एमपीसी न्यूज – महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी महिला विभागाच्या अ‍ॅड. विद्याराणी प्रवीण आगरकर-भुजबळ यांची तर, ज्येष्ठ समाजसेविका वंदना सुभाष जाधव यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेशच्या महिलाध्यक्षा मंजिरी धाडगे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर भुजबळ यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.