Pimpri: महापालिकेच्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये लाभ देण्यासासाठी पालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2018 पर्यंत होती. तथापि, काही शैक्षणिक योजनांच्या बाबतीत महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रीया अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती.

त्यामुळे या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारण्यास 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे या मुदवाढीच्या वेळेत नागरिकांनी अर्ज करावेत. तसेच ही मुदतवाढ अंतिम असणार आहे, असेही झगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.