Pimpri : पिंपरी विधानसभेचा उमेदवार जाहीर; या पक्षाने केला उमेदवार जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेच्या (Pimpri) सर्वांगीण विकासासाठी आम्ही मनोज गरबडे या समता सैनिक दलाच्या सैनिकाची उमेदवारी जाहीर करीत आहोत. पिंपरी विधानसभेत या वेळेस नक्की परिवर्तन घडणार, असा विश्वास समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

शाई ते लोकशाही या अभियानांतर्गत समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा (पिंपरी-चिंचवड युनिट) यांच्या नेतृत्वाखाली या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर तसेच मनोज गरबडे हे उपस्थित होते. पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या नावाच्या जयघोषात मोटारसायकल व चारचाकी रॅली काढण्यात आली.

Pune : ‘गोपाळ विनायक जोशी माझा समुद्र प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन

दरम्यान, पिंपरी येथील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असणाऱ्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात (Pimpri) आला. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले,देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता शिक्षण व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, वाढती अराजकता, बेरोजगारी हे देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या बाबी आहेत. राजकीय उदासीनता यास कारणीभूत आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तयार असायला हवे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.