Pimpri : चेंबूर येथील रेशनिंग दुकानदाराला झालेली मारहाण दुर्दैवी – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूंशी दोन हात करत असताना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी रेशनिंग दुकानदार जीवाची पर्वा न करता नागरिकांना धान्य वितरित करत आहेत. असे असताना चेंबूर येथील एका रेशनिंग दुकानदाराला झालेली मारहाण हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, अशी खंत ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशन संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी व्यक्त केली.

शासनाने या प्रकरणात लक्ष घालून रेशन दुकानदारांचा नागरिकांशी सतत संपर्क येत असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण व पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट शासनामार्फत पुरवावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

रेशनिंग दुकानदारांनी समाजातील समाजकंटक, राजकीय दादागिरी यांना बळी न पडता शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे धान्य वितरित करावे. तसेच रेशनिंग दुकानदार यांनीही कोणतेही चुकीचे काम करू नये, असे बाबर यांनी म्हटले आहे. धान्याचे वितरण करताना नागरिकांना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करावे, अशी सुचनाही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.