Pimpri : भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी भारती कदम

एमपीसी न्यूज- भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी भारती कदम यांची आज (शुक्रवारी) निवड करण्यात आली आहे. तर, भोर- वेल्हा-मुळशी तालुका युवा अध्यक्षपदी निलेश ढमाले यांची निवड करण्यात आली आहे.

युवा पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप गायकवाड,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजय भोईर, उपाध्यक्ष गिरीश पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष निमिष पळशीकर ,दीपक पिंपळे,विशाल घोंगडे उपस्थित होते. तसेच नवीन पक्ष प्रवेश केलेले कार्यकर्तेही उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टीच्या निवड समितीनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.