Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

एमपीसी न्यूज- सरस्वती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्रज्ञ डॉ सी व्ही रमण यांच्या ‘प्रकाशाचे विकिरण’ या संशोधन बद्दल राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गणित व विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा, निबंध, रांगोळी, प्रकल्प स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विमलाबाई गरवारे कॉलेजचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक योगेशचंद्र देवळालीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, सदस्य विश्वास देशपांडे उपस्थित होते.

विज्ञान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विज्ञानाची कास धरा. आपल्या सभोवती निसर्गात घडणाऱ्या घटनांमागे कोणते वैज्ञानिक सत्य आहे ते शोधून काढा व चांगले संशोधक बना. असे आवाहन योगेशचंद्र देवळालीकर यांनी विद्यार्थ्यांना केले. अध्यक्ष सुरेश झेंड, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक नितीन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख सुरेखा रासकर यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. बक्षिसाचे वाचन सविता भोकटे यांनी केले. तर पिनाक देशपांडे व कल्याणी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान शिक्षिका सुरेखा रासकर व सविता भोकटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कल्याणी जोशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.