Vadgaon maval : सुवर्णकन्या हर्षदा गरुड हिचे वडगाव शहरात जंगी स्वागत

एमपीसी न्यूज- वडगाव मावळची सुवर्णकन्या हर्षदा शरद गरुड हिने नुकत्याच आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले त्यानंतर अशियाई स्पर्धा ताश्कंद (उझबेकिस्तान) येथील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्यपदक पटकावून मावळ तालुक्याचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले. शुक्रवारी (दि. 28) तिचे वडगाव शहरात आगमन झाल्यानंतर बैलगाडीत भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी वडगाव शहर नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी प्रथम वडगाव रेल्वे स्थानकात हर्षदा हिचे स्वागत केले. यावेळी पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त अरूण चव्हाण, प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील चव्हाण, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, वडगाव खडकाळा विभाग शिवसेना माजी अध्यक्ष अनिल ओव्हाळ, माथाडीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वडगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणूकीदरम्यान जागोजागी हर्षदा हिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.