Pimpri : ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव रद्द करा; सचिन चिखले यांची मागणी

एमपीसी न्यूज – शहरातील सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसताना महापालिच्या कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्मार्ट वॉच घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. तो प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब केला आहे. मात्र हा प्रस्ताव तहकूब न करता पूर्णतः रद्दच कारावा, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी स्थायी समिती समोर स्मार्ट वॉचचा ठराव ठेवला होता. यासाठी दरमहा 286 अधिक जीएसटी प्रमाणे एकूण दरमहा 13 लाख 4 हजार 128 रुपये तर एका वर्षासाठी 1कोटी 56 लाख 49 हजार 536 रुपये असा एकूण 6 कोटी 285 लाख 98 हजार 144 रुपयांचा खर्च येणार आहे. हा ठाराव स्थायी समितीच्या समोर मांडण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला सफाई कामगारांना बूट, हातमोजे दिले गेलेले नाहीत त्यांना मुलभुत सुविधा नसताना महापालिकेने अशा वॉचवर कोट्यवधी रुपये खर्च करु नयेत, त्यातल्या त्यात थेट पद्धतीने खेरेदीसाठी मनसेचा विरोध असणार असून या निवेदेचा अभ्यास करण्यासाठी तुर्तास स्थायी समितीने हा प्रस्ताव तहकूब ठेवला आहे. मात्र तो तहकूब न ठेवता सरळ रद्द करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.