Dehuroad : सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल मधील 14 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट पुरस्कार

एमपीसी न्यूज – इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठ (औरंगाबाद) आयोजित राष्ट्रीय ऑलिम्पियाड चित्रकला स्पर्धेत देहूरोड येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल मधील 14 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट पुरस्कार मिळाला. तसेच शाळेचे कलाशिक्षक श्रीकांत बाळासाहेब जाधव यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठाचा कलाश्री पुरस्कार देण्यात आला.

इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठ (औरंगाबाद) यांनी राष्ट्रीय ऑलिम्पियाड चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये देहूरोड येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल मधील 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उत्तमोत्तम चित्रे सादर केली. त्यातील 14 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट पुरस्कार मिळाला.

तसेच सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रेणुकादेवी कोरनाथ यांना सर्वोत्तम मुख्याध्यापिका तर कलाशिक्षक श्रीकांत जाधव यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठाचा कलाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या यशाचे शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांकडून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.