Pimpri : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोमवारी (दि. २४) आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या (मंगळवार, दि. २५) प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्या शहरातून जाणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी हजारो भक्त आणि शेकडो पालख्या अलंकापुरीत दाखल झाल्या आहेत. या पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालखी आल्यानंतर ज्या ठिकाणी पालखी आहे, त्या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका या वाहनांना सूट देण्यात आली आहे. वाहतुकीतील हे बदल बुधवार (दि. २६) पर्यंत असणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त २१ ते २६ जून या कालावधीत शहरातील काही मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहेत.

  • # संत ज्ञानेश्वर महाराज पालखी देहूफाटा आळंदी चौक पास होईपर्यंत

१)वाहतुकीसाठी बंद रस्ता –पुणे-आळंदी रस्ता (मॅगझीन चौक) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – पुणे-दिघी- मॅग्झिन चौक-मोशी-चाकण

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – मोशी-देहूफाटा रस्ता (डुडुळगाव जकात नाका)
पर्यायी मार्ग –अ) मोशी-चाकण-शिक्रापूर
ब) मोशी-भोसरी-मॅगझीन चौक-दिघी या मार्गाचा वापर करावा

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भोसरी वखार महामंडळ चौक (जय गणेश साम्राज्य चौक) ते अलंकापुरम चौक
पर्यायी मार्ग – अ) मोशी-चाकण-शिक्रापूर या मार्गाचा वापर करावा

४) वाहतुकीसाठी बंद रस्ता – हवालदार वस्ती मोशी मार्ग
पर्यायी मार्ग – अ) मोशी-हवालदार वस्ती-भोसरी

५) वाहतुकीसाठी बंद रस्ता – चाकण-आळंदी रस्ता (करवा धर्मशाळा)
पर्यायी मार्ग –अ) पुण्याकडे जाणा-या वाहनांकरिता चाकण-मोशी-दिघी-मॅगझीन चौक
ब) चाकण-पिंपळगाव फाटा-मरकळ-लोणीकंद (सोलापूर महामार्ग) मार्गाचा वापर करावा

६) वाहतुकीसाठी बंद रस्ता – वडगाव-घेनंद-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – अ) वडगाव-घेनंद-पिंपळगाव फाटा चाकण – नाशिक महामार्ग

७) वाहतुकीसाठी बंद रस्ता – मरकळ-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग –अ) मरकळ-सोळू-धानोरे-च-होली खुर्द (पीसीएस कंपनी बायपास रोडने च-होली बुद्रुक पुणे)
ब) मरकळ-कोयाळी-वडगाव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण

८) वाहतुकीसाठी बंद रस्ता – चिंबळी-आळंदी रस्ता (केळगाव चौक)
पर्यायी मार्ग – चिंबळी-मोशी-भोसरी-मॅगझीन चौक दिघी-पुणे

९) वाहतुकीसाठी बंद रस्ता – शेल पिंपळगाव-आळंदी फाटा
पर्यायी मार्ग – चाकण-मोशी-भोसरी

१०) वाहतुकीसाठी बंद रस्ता – चाकण-आळंदी फाटा
पर्यायी मार्ग – मोशी-भोसरी

११) वाहतुकीसाठी बंद रस्ता – चिंबळी फाटा
पर्यायी मार्ग – मोशी-भोसरी

१२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – देहूफाटा मोशी
पर्यायी मार्ग – अ) मोशी-भोसरी
ब) मोशी-चाकण

  • # देहूफाटा आळंदी चौक ते मॅगझीन चौक पास होईपर्यंत

वाहतुकीसाठी बंद रस्ता – देहूफाटा चौक आळंदी
पर्यायी मार्ग – अ) आळंदीकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांनी आळंदी देहूरोड मार्गे मोशी-पुणे नाशिक महामार्गाने नाशिक फाटा ओव्हर ब्रिजवरून
ब) च-होली बुद्रुक लोणीकंद मार्गे पुण्याकडे जाणारा पर्यायी मार्ग

  • # मॅगझिन चौक ते बोपखेल फाटा पास होईपर्यंत

वाहतुकीसाठी बंद रस्ता – मॅगझीन चौक
पर्यायी मार्ग – आळंदीकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांनी भोसरी, नाशिक फाटा मार्गाचा वापर करावा

  • संत तुकाराम महाराज पालखी निमित्त २३ ते २५ जून या कालावधीत शहरातील काही मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहेत.

# देहू गावातून प्रस्थान करेपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – चाकण-देहूफाटा (चाकण-तळेगाव रोड)
पर्यायी मार्ग – तळेगाव-देहूरोड

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – येळवाडी फाटा-ड्रायव्हर ढाबा (चाकण तळेगाव रोड)
पर्यायी मार्ग – तळेगाव-देहूरोड

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता –भंडारा डोंगर पायथा (चाकण-तळेगाव रोड)
पर्यायी मार्ग – चाकण आणि तळेगाव या मार्गाचा वापर करावा

४) वाहतुकीसाठी बंद रस्ता – देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे रस्ता)
पर्यायी मार्ग – अ) देहूरोड-तळेगाव
ब) निगडीमार्गे

५) वाहतुकीसाठी बंद रस्ता – कॅनबे चौक (तळवडे-देहूगावकडे जाणारा रस्ता)
पर्यायी मार्ग – देहू आळंदी रोडवरून कॅप जेमिनी चौक ते निघोजे एमआयडीसी रोड, महिंद्रा अँड महिंद्रा या मार्गाचा वापर करावा

  • # परंडवाल चौक ते देहू कमान ते भक्ती-शक्ती चौक पास होईपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – सेंट्रल चौक (जुना पुणे-मुंबई रस्ता) पहाटे तीन पासून आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – मुंबई कडून येणा-या वाहनांनी किवळे मार्गे कात्रज बायपास रस्ता वापरावा

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भक्ती-शक्ती चौक (सकाळी सात वाजल्यापासून)
पर्यायी मार्ग – अ)पिंपरी-चिंचवड मधून मुंबईकडे जाणा-या वाहनांनी भक्ती शक्ती चौक येथून भेळ चौक, संभाजी चौक, रावेत, मार्गाचा वापर करावा
ब) पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या वाहनांनी खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून चाफेकर चौक-रावेत मार्ग वापरावा

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भक्ती-शक्ती चेक पोस्ट
पर्यायी मार्ग – निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथून भक्ती-शक्ती चौकाकडे बाहेर येणारी सर्व वाहतूक बंद. यासाठी रावेत मार्गाचा वापर करावा.

  • # भक्ती-शक्ती चौक ते विठ्ठल मंदिरात पोहोचेपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भक्ती-शक्ती चेक पोस्ट
पर्यायी मार्ग – निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथून भक्ती-शक्ती चौकाकडे बाहेर येणारी सर्व वाहतूक बंद. या वाहनांनी रावेत मार्गाचा वापर करावा.

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भक्ती-शक्ती चौक
पर्यायी मार्ग – अ) मुंबईकडून येणा-या सर्व वाहन चालकांनी भोसरीकडे जाण्यासाठी त्रिवेणीनगर, थरमॅक्स चौक मार्गाचा वापर करावा.
ब) मुंबईकडून येणा-या सर्व वाहनचालकांनी चिंचवड किंवा वाकडकडे जाण्यासाठी भेळ चौक-संभाजी चौक मार्गाचा वापर करावा.

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता – दुर्गादेवी चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – चिकन चौक किंवा थरमॅक्स चौक, खंडोबाचा माळ रस्ता

४) वाहतुकीसाठी बंद रस्ता – म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक, खंडोबाचा माळ, संभाजी चौक, बिजलीनगर, चिंचवडे फार्म, रावेत

५) वाहतुकीसाठी बंद रस्ता – सी-लाई समोरील ग्रेड सेपरेटर एक्झिट मधून सर्व वाहतूक बाहेर जाईल व ग्रेड सेपरेटरमधून निगडीकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद
पर्यायी मार्ग – ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडणारी सर्व वाहतूक खंडोबामाळ चौकातून चापेकर चौक किंवा थरमॅक्स चौक मार्गाचा वापर करावा.

६) वाहतुकीसाठी बंद रस्ता – काळभोरनगर ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या मार्गावरील ग्रेडसेप्रेटरवरील सर्व पंक्चर पूर्णतः बंद
पर्यायी मार्ग – सर्व वाहनांनी मुख्य रस्त्याच्या वापर करावा.

  • # विठ्ठल मंदिर आकुर्डी ते खंडोबा माळ पास होईपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडी जकात नाका ते खंडोबा माळ दरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडे जाणारा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – खंडोबा माल कडून प्राधिकरणाकडे जाणा-या वाहनांनी एस के एफ कंपनी रोडवरून चापेकर चौक-बिजलीनगर येथून प्राधिकरणाकडे जावे

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – ग्रेड सेपरेटरच्या डाव्या बाजूचा रस्ता बंद
पर्यायी मार्ग – अ) पुण्याकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांकरीता भक्ती-शक्ती चौक ते ग्रेडसेपरेटर मार्गे नाशिक फाटा रस्त्याच्या वापर करावा
ब) सर्व्हिस रोड वरून पुण्याकडे जाणा-या वाहनांकरिता प्राधिकरण-भक्ती-शक्ती चौक ते थरमॅक्स चौक मार्गे टेल्को रोड व अंतर्गत रस्त्याचा वापर करावा

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता – थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ चौक
पर्यायी मार्ग – के एस बी मार्गे पुण्याकडे

४) वाहतुकीसाठी बंद रस्ता – भक्ती शक्ती चौक-टिळक चौक सर्व्हिस रोड पुण्याकडे जाण्यासाठी बंद
पर्यायी मार्ग – ग्रेड सेपरेटर मार्गे पुणे मार्गाचा वापर करावा

५) वाहतुकीसाठी बंद रस्ता – बिजलीनगर चौक
पर्यायी मार्ग – निगडी प्राधिकरणकडे जाणा-या वाहनांनी बिजलीनगर चौक येथे डावीकडे वळून डी वाय पाटील कॉलेज समोरून जाणा-या मार्गाचा वापर करावा

६) वाहतुकीसाठी बंद रस्ता – दळवीनगर चौक व एसकेएफ चौक
पर्यायी मार्ग – खंडोबामाळकडे जाणा-या वाहनांनी बिजलीनगर चौक मार्गाचा वापर करावा

  • # खंडोबा माळ चौक ते नाशिक फाटा चौक पास होईपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – रिव्हर व्यू हॉटेल चौक व चिंचवडेनगर टी जंक्शन
पर्यायी मार्ग – चिंचवडगाव, महावीर चौक भोसरीकडे जाण्यासाठी चिंचवडे फार्म, वाल्हेकरवाडी निगडी मार्गे

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – लोकमान्य हॉस्पिटल चौक चिंचवड
पर्यायी मार्ग – भोसरीकडे जाण्यासाठी डावीकडे वळून दळवीनगर, खंडोबामाळ चौक, थरमॅक्स चौक मार्गाने जावे

३) वाहतुकीसाठी बंद रस्ता – महावीर चौक व शिवाजी चौक-महावीर चौक येथून पालखी पास होत असताना वाहतूक मार्ग बंद
पर्यायी मार्ग – अ) चिंचवडकडे जाणा-या वाहनांनी मोहननगर, केएसबी चौक, टेल्को रोड, खंडोबामाळ चौक किंवा निगडी मार्गे
ब) केएसबी चौक, भोसरीकडे जाणा-या वाहनांनी दळवीनगर, खंडोबामाळ किंवा निगडीमार्गे

४) वाहतुकीसाठी बंद रस्ता – केएसबी चौक
पर्यायी मार्ग – जड वाहने टेल्को रोडने भोसरी-भक्ती शक्ती चौक निगडी किंवा स्पाईनरोड एमआयडीसी भोसरी मार्गे

५) वाहतुकीसाठी बंद रस्ता – सम्राट चौक
पर्यायी मार्ग – अजमेरा रसरंग मार्गे यशवंतनगर चौक मार्गे

६) वाहतुकीसाठी बंद रस्ता – एच ए ब्राऊन कॉर्नर
पर्यायी मार्ग – पिंपरी, काळेवाडी, वाकडकडे जाणा-या वाहनचालकांनी भोसरी-नाशिक फाटा मार्गाचा वापर करावा

७) वाहतुकीसाठी बंद रस्ता – साई चौक
पर्यायी मार्ग – साई चौकाकडे येणा-या वाहन चालकांनी गेलार्ड चौक काळेवाडी किंवा चिंचवड लिंक रोडने जावे

८) वाहतुकीसाठी बंद रस्ता – शगुन चौक
पर्यायी मार्ग – शगुन चौकाकडे येणा-या वाहनाई डिलक्स चौक मार्गे काळेवाडी किंवा चिंचवड लिंक रोडने जावे

९) वाहतुकीसाठी बंद रस्ता – मोशी चौक
पर्यायी मार्ग – आळंदी मार्गे जाणा-या जड वाहनांनी मोशी येथून पुणे नाशिक रस्ता – चाकण – शिक्रापूर मार्गे जावे

१०) वाहतुकीसाठी बंद रस्ता – नाशिक फाटा
पर्यायी मार्ग –अ) नाशिककडून पुण्याकडे जाणा-या वाहनांनी ओव्हर ब्रिज वरून पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवकडे
ब) मुंबईकडून येणा-या वाहनांनी कात्रज बायपास किंवा भक्ती-शक्ती चौकातून प्राधिकरण डांगे चौक मार्गे
क) पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या वाहनांनी शिवाजीनगर, चतुःशृंगी, बाणेर रोडने बालेवाडी किंवा औंध रोडने डांगे चौक किंवा भूमकर चौक मार्गाचा वापर करावा
ड) नाशिककडे जाणा-या वाहनांनी काळेवाडी फाटा, काळेवाडी नवीन पुलावरून केएसबी चौक पिंपरी किंवा नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूल मार्गे जावे

  • # नाशिक फाटा ते हॅरिस ब्रिज पास होईपर्यंत

१) वाहतुकीसाठी बंद रस्ता – नाशिक फाटा
पर्यायी मार्ग – अ) नाशिककडून पुण्याकडे जाणा-या वाहनांनी ओव्हर ब्रिज वरून पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव कडे
ब) मुंबईकडून येणा-या वाहनांनी कात्रज बायपास किंवा भक्ती-शक्ती चौकातून प्राधिकरण डांगे चौक मार्गे
क) पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या वाहनांनी शिवाजीनगर, चतुःशृंगी, बाणेर रोडने बालेवाडी किंवा औंध रोडने डांगे चौक किंवा भूमकर चौक मार्गाचा वापर करावा
ड) नाशिककडे जाणा-या वाहनांनी काळेवाडी फाटा, काळेवाडी नवीन पुलावरून केएसबी चौक पिंपरी किंवा नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूल मार्गे जावे

२) वाहतुकीसाठी बंद रस्ता – फुगेवाडी चौक
पर्यायी मार्ग – अ) पुण्याकडून पिंपरी-चिंचवड किंवा भोसरीकडे जाण्यासाठी दापोडी उड्डाणपुलावरून जावे
ब) पुणे शहरात जाण्यासाठी सांगवी किंवा काळेवाडी मार्गे जाणा-या अंतर्गत रस्त्याने जावे

  • # पालखी मार्गांना छेदणा-या रस्त्यांवर आतील भागात शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई आहे.
    # पालखी आगमन व प्रस्थान झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.