Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत वाढ! शहरात आज नवीन 150 रुग्णांची नोंद, 137 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 150 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 137 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 79 हजार 136 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 462 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 237 रुग्ण गृहविलगीकरणात असून 225 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 37 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 308 आहेत. आज दिवसभरात 12 हजार 660 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 29 लाख 66 हजार 558 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.