Pimpri Chinchwad Crime News : अवैध दारूसाठा प्रकरणी चार ठिकाणी कारवाई

एमपीसी न्यूज – अवैध दारूसाठा प्रकरणी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. आळंदी, चाकण, पिंपरी व देहूरोड परिसरात शुक्रवारी (दि.15) ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 11 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.

आळंदी परिसरात केलेल्या कारवाईत 3 हजार 238 किंमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मनोज मधुकर मगर (वय 25, रा. च-होली, हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_II

म्हाळुंगे याठिकाणी म्हाळुंगे पालिसांनी कारवाई करत 2,860 रूपये किंमतीचा देशी दारू साठी जप्त केला. याप्रकरणी गोपाळ तुळा बोह्या (वय 37, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड येथील थरमॅक्स चौकाच्या जवळ गुन्हे शाखा युनिट-2 ने कारवाई केली. या ठिकाणाहून 2,020 किंमतीची 20 लिटर गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नितल पारशी भोसले (वय 32, रा. रामनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलिसांनी आंबेडकर नगर याठिकाणी कारवाई करत 2,800 रूपयांचा गावठी दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी गोविंद इराण्णा चलवादी (वय 39, रा. आंबेडकरनगर, देहूरोड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.