Pimpri: पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका घेणार स्वयंसेवी संस्थांची मदत; पूरग्रस्त 13 ठिकाणे निश्चित

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to take help of NGOs to handle flood situation; Fixed 13 flooded places जुनी सांगवी ते रावेतपर्यंतची ही ठिकाणे आहेत. प्रत्येक परिसरासाठी 20 ते 25 जणांचा ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपमधील पहिल्या पाच जणांची कोअर कमिटी करत आहोत. त्या पाच जणांची बैठक घेतली.

एमपीसी न्यूज- मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेली मोठी पूरपरिस्थिती, नदीकाठच्या भागातील नागरिकांची झालेली तारांबळ पाहता आणि तो अनुभव लक्षात घेत पालिकेने यंदा खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. त्यांना प्रशिक्षण देणार आहे. पूरपरिस्थितीत जिथे पाणी शिरते अशी 13 ठिकाणे निश्चित केली आहेत. जुनी सांगवी ते रावेतपर्यंतची ही ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणी 20 ते 25 जणांचा ग्रुप तैनात केला जाणार आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून मुळा नदी 11 किमी, पवना नदी 25 किमी आणि इंद्रायणी नदी 20.60 किमी वाहते. मुळा नदीचे शहरातून कमी पात्र वाहत असले तरी मुळा नदीला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे सांगवी भागातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते.

मागील वर्षी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातून तसेच मुळशी धरणातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता.

त्यामुळे पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने नदीकाठी असलेल्या सांगवी, दापोडी, पिंपळेगुरव, कस्पटे वस्ती, वाकड, चिंचवडगाव, पिंपरी, कासारवाडी, या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते.

यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने यंदा अगोदरच खबरदारी घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार, अग्निशमन दलाचे किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल उपस्थित होते.

याबाबतची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे लागणार आहे. त्यासाठी थेरगाव फांऊडेशन, बजरंग दल, ओंकार ग्रुप, जुनी, नवी सांगवी, वाल्हेकरवाडी, संजयनगर असे 13 ठिकाणच्या ग्रुपच्या स्वयंसेवकांसोबत चर्चा झाली.

स्वयंसेवी संस्थेच्या 80 लोकांची बैठक घेतली. पूरपरिस्थितीत जिथे पाणी शिरते अशी 13 ठिकाणे निश्चित केली आहेत.

जुनी सांगवी ते रावेतपर्यंतची ही ठिकाणे आहेत. प्रत्येक परिसरासाठी 20 ते 25 जणांचा ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपमधील पहिल्या पाच जणांची कोअर कमिटी करत आहोत. त्या पाच जणांची बैठक घेतली.

अग्निशामन, आपत्ती आणि सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी असे एकत्रित नियोजन केले जात आहे. पुन्हा पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल. काय तयारी केली आहे. त्याचा आढावा घेतला जाईल.

स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार

आपत्ती व्यवस्थापनात काम करण्यासाठी जे इच्छूक आहेत. त्यांना बोट चालविणे, अग्निशामकचे प्रशिक्षण देणार आहोत. स्वयंसेवकांची यादी केली जात आहे. त्यानुसार बोटिंग कसे चालवितात.

पाण्यात बुडताना बाहेर कसे काढायचे. सेफ्टी मेजर कसे वापरायचे. ड्रोन कसा वापरतात. प्रथम उपचार कसे द्यायचे याचे प्रशिक्षण पुढील आठवड्यात दिले जाणार आहे. मागील वर्षीचे अनुभव घेता. यंदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास चांगली हाताळली जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.