Pimpri Chinchwad RTO News : पिंपरी चिंचवड आरटीओ मधील कामकाज सोमवारी बंद

एमपीसी न्यूज –  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार (दि. 7) रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

ज्या अर्जदारांनी अनुज्ञप्ती चाचणी अथवा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणीसाठी पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली आहे, अशा उमेदवारांचे, वाहनांचे कामकाज रविवारी (दि. 13) नियोजित ठिकाणी करण्यात येईल असेही आदे म्हणाले.

लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील 28 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शासनाने एक दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे. सोमवारी (दि. 7) शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.