Pune News : घटस्फोटाचे प्रमाण वाढतेय ! तीन वर्षात 10 हजार प्रकरणे दाखल, 4 हजार परस्पर सहमतीने

एमपीसी न्यूज – अलीकडे समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. वाढलेली जागृकता, पती पत्नी दोघेही कमवते असल्याने, एकमेकांच्या विचार व स्वातंत्र्याला प्राधान्य देण्याची मानसिकता जोडप्यामध्ये वाढत आहे. मगील तीन वर्षात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची तब्बल 10 हजार प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी 4 हजार प्रकरणे परस्पर सहमतीने दाखल करण्यात आली आहेत.

कौटुंबिक वादातून भांडण करीत आयुष्य जगण्यापेक्षा कायमचे विभक्त होवू. त्यासाठी एकत्र बसून शांतपणे चर्चा करू, एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊ आणि आपले मार्ग मोकळे करू, अशी मानसिकता घटस्फोट घेत असलेल्या जोडप्यांमध्ये  वाढत आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांचा समावेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायिक क्षेत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांतील वैवाहिक स्वरूपाचे दावे कौटुंबिक न्यायालयाकडे दाखल होऊ लागले आहेत.

गेल्या तीन वर्षात दाखल झालेली घटस्फोटाची प्रकरणे

2019 – एकूण 3 हजार 874 प्रकरणे दाखल, (1,300) परस्पर सहमतीने
2020 – एकूण 2 हजार 332 प्रकरणे दाखल, (676) परस्पर सहमतीने
2021 – एकूण 3 हजार 797 प्रकरणे दाखल, (2,005) परस्पर सहमतीनेमागील तीन वर्षात घटस्फोटाची तब्बल 10 हजार प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाली त्यापैकी 3 हजार 981 प्रकरणे ही परस्पर सहमतीने दाखल करण्यात आली आहेत. बदलत्या काळानुसार घटस्फोटाची कारणे देखील बदलू लागली आहेत. यामध्ये जोडप्यांचा अहंकार, अवाजवी अपेक्षा, आर्थिक स्थैर्य, कुटुंबियांसाठी वेळ न देणे, सोशल मिडियाचा अधिक वापर अशा कारणांचा समावेश आहे. वाद करत बसण्यापेक्षा परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा पर्याय जोडपी निवड असल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.